माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची ३३ वी पुण्यतिथी, मोदी,काँग्रेसकडून श्रद्धांजली!

- Advertisement -

दिल्ली – देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज ३३ वी पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

इंदिरा गांधीच्या पुण्यतिथी निमित्त काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींसोबत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी श्रद्धांजली वाहण्यासाठी इंदिरा गांधींच्या समाधी स्थळावर उपस्थित होते. तसेच काँग्रेस पक्षाने ट्विटरवरही इंदिरा गांधीना श्रद्धांजली अर्पण केली.
सत्ताधारी पक्षातील दिग्गज नेत्यांनीही इंदिरा गांधीना सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समावेश आहे.

- Advertisement -

- Advertisement -