Friday, March 29, 2024
Homeदेशमध्य प्रदेशात चार हॉकीपटू कार अपघातात ठार!

मध्य प्रदेशात चार हॉकीपटू कार अपघातात ठार!

 Four national level hockey players dead, three injured
मध्य प्रदेश : चार राष्ट्रीय स्तरावरील हॉकीपटू कारअपघातात ठार झाले. तीन खेळाडू जखमी झाले. मध्य प्रदेशातील होशंगाबादमध्ये ही घटना घडली. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. शाहनवाझ खान, आदर्श हरदुआ, आशिष लाल व अनिकेत अशी मृत खेळाडूंची नावं आहेत.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६९ वर रैसलपूर गावाजवळ हा अपघात झाला. अपघातग्रस्त स्वीफ्ट डिझायर कारमध्ये एकूण सात खेळाडू होते. हे सर्व खेळाडू मध्य प्रदेश हॉकी अकादमीचे होते. ध्यानचंद हॉकी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ते होशंगाबादला आले होते. इटारसीच्या दिशेनं जाताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यानंतर ही कार एका झाडावर जाऊन आदळली. त्यात चौघांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments