Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeदेशपोलिस ठाण्यात दारु पिऊन नाचणारे चार पोलिस कर्मचारी निलंबित

पोलिस ठाण्यात दारु पिऊन नाचणारे चार पोलिस कर्मचारी निलंबित

महत्वाचे…
१. पोलिस स्टेशन प्रभारीची बदली रद्द २. बदली झाल्याने पोलिसांनी केली चक्क चौकीबाहेरच ओली पार्टी ३.१७ नोव्हेंबरच्या रात्री दीपनाखेडा पोलिस स्टेशन प्रभारीच्या उपस्थित झाली पार्टी


विदिशा (मध्य प्रदेश) : पोलिस स्टेशन प्रभारीची बदली रद्द झाल्याने पोलिसांनी चक्क चौकीबाहेरच ओली पार्टी करत गाण्यांवर डान्सही केला. मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील दीपनाखेडा पोलिस स्टेशनमध्ये हा प्रकार घडला.

या प्रकरणी पोलिस स्टेशन प्रभारीसह चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. विदिशाचे पोलिस अधीक्षक विनित कपूर यांनी ही कारवाई केली. १७ नोव्हेंबरच्या रात्री दीपनाखेडा पोलिस स्टेशन प्रभारीच्या उपस्थितीत डीजे पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. पोलिस स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारावरच पोलिसांनी दारु पिऊन डान्स केला.

विदिशा भागात हा प्रकार घडला आहे. पोलिस स्टेशन प्रभारीची दुसऱ्या शहरात बदली होणार होती. मात्र शिफारशीनंतर ही बदली रद्द झाल्यामुळे पोलिसांनी चौकीतच पार्टी आयोजित केली. प्राथमिक चौकशीनंतर दीपनखेडा पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक योगेंद्र सिंह परमार, मुख्य आरक्षक हसन अलीम यांच्यासह आणखी दोन कर्मचाऱ्यांला निलंबित करण्यात आलं आहे. उपनिरीक्षक अमित चतुर्वेदी यांची दीपनाखेडा पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments