चिडवण्याला कंटाळून तरुणीची शाळेच्या इमारतीवरुन उडी

- Advertisement -

कोल्लम – शाळेत इतर विद्यार्थ्यांच्या त्रासाला कंटाळून शाळेच्या इमारतीवरुन उडी मारुन जखमी झालेल्या १५ वर्षीय तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शुक्रवारी तरुणीने इमारतीच्या तिस-या मजल्यावरुन उडी मारली होती. एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. आज उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

ट्रिनिटी लेसेयुम शाळेत दहावीत शिकणा-या या विद्यार्थिनीने आपल्या धाकट्या बहिणीला देण्यात आलेल्या शिक्षेला विरोध केला होता. १३ वर्षीय धाकट्या बहिणीला वर्गात बोलत असल्या कारणाने शिक्षकांनी शिक्षा दिली होती. वर्गात मुलांसोबत बसण्याची शिक्षा तिला सुनावण्यात आली होती. आपल्या धाकट्या बहिणीला देण्यात आलेल्या शिक्षेविरोधात तिने आवाज उठवला होता. यावरुन तिचं शिक्षकांसोबत भांडणही झालं होतं.

- Advertisement -

तरुणीच्या आईने शाळा प्रशासनाची भेट घेत आफण पोलीस तक्रार करु अशी धमकी दिली होती. यानंतर पुन्हा असं होणार नाही असं आश्वासन शाळेकडून देण्यात आलं होतं. मात्र यानंतर बहिणीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षेला विरोध केल्याने तिला चिडवण्यास सुरुवात केली होती. वारंवार होणा-या या त्रासामुळे संतापलेल्या तरुणीने शाळेच्या इमारतीवरुन उडी घेतली. तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण डॉक्टर तिला वाचवण्यात अपयशी ठरले. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली दोन शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस तपास करत आहेत अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिका-याने दिली आहे.

- Advertisement -