गोवा महिलांसाठी सुरक्षित, तर दिल्ली,बिहार असुरक्षित

- Advertisement -

नवी दिल्ली : ‘चाइल्ड डेव्हलपमेंट एनजीओ प्लान इंडिया’नं जेंडर वर्नेबिलिटी इंडेक्स (GVI) प्रसिद्ध केलाय. त्यानुसार महिला सुरक्षेसाठी गोवा सगळ्यात वरच्या स्थानावर आहे आणि बिहार सगळ्यात खाली आहे. भारतात गोव्यामध्ये महिला सगळ्यात जास्त सुरक्षित आहेत. यानंतर केरळ, मिझोराम, सिक्किम आणि मणिपुर या शहरांचा नंबर येतो.

त्यातच महिलांच्या सुरक्षिततेसाठी सगळ्यात असुरक्षित शहरं म्हणजे बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेश इत्यादी आहेत. एवढंच काय तर देशाची राजधानी दिल्लीचं नाव या लिस्टमध्ये बिहारच्याही वर आहे. म्हणजे दिल्लीमध्ये महिला सगळ्यात जास्त असुरक्षित आहेत.

प्लान इंडियाने हा अहवाल तयार केला आहे आणि महिला व बाल विकास मंत्रालयाने तो जाहीर केला. या अहवालात महिलांना कोणकोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागतंय हे नमूद केलंय. यात शिक्षण, आरोग्य, गरिबी आणि हिंसा या गोष्टी आहेत. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने  गोवा प्रथम, शिक्षणात गोवा पाचव्या, आरोग्यात गोवा सहाव्या आणि गरिबीमध्ये 8व्या नंबरवर आहे.

- Advertisement -
- Advertisement -