Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशसोनं पहिल्यांदाच ४३ हजारांच्या पार!

सोनं पहिल्यांदाच ४३ हजारांच्या पार!

मुंबई : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सोनं ४३ हजार रुपयांच्या पार गेलं आहे. दिल्ली सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव ७०० रुपयांनी वाढून प्रति १० ग्राम ४३,१७० रुपयांवर पोहोचला आहे. तर, बुधवारी मुंबईसह देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या भावात प्रति १० ग्रॅममागे सरासरी ४५० रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.

सोन्यासोबतच चांदीचा भावही प्रति किलोमागे ५०० ते १,००० रुपयांनी वधारला आहे. चांदीचा दर प्रतिकिलो ४८,६०० रुपयांपर्यंत पोहोचला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय रुपयाची किंमत घसरल्यामुळे आणि कोरोना विषाणूमुळे सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं विशेषज्ञ सांगतात.

का महागलं सोनं, चांदी?

आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढता दर आणि लग्नाच्या मोसमात वाढती मागणी याचा परिणाम सराफा बाजारावर झाला. तसेच, चीनमधील जीवघेण्या कोरोना विषाणूच्या (Corona Virus) धोक्यामुळे आंतराष्ट्रीय स्तरावर सोन्याची किंमत १६०० डॉलर प्रति औंसच्या पार गेली, अशी माहिती एचडीएफसी सिक्युरिटीजचे ज्येष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी दिली.

आठवडाभरात सोनं १५०० रुपयांनी महागलं

गेल्या आठवडाभरात सोनं जवळपास १५०० रुपयांनी वधारलं आहे. तसेच, चांदीच्या किंमतीही वाढल्या आहेत. लग्नसराईमुळे पुढील काही दिवसांत सोन्याची मागणी आखणी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments