Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeदेशसोन्याचे दर पुन्हा गगनाला भिडले!

सोन्याचे दर पुन्हा गगनाला भिडले!

मुंबई : गेल्या आठवड्यात सोने दरात मोठी घसरण झाली होती. सोन्याचा भाव ४० हजारांखाली गेला होता. कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या मागणीत वाढ झाल्याने मंगळवारी सोने दरात तेजी दिसून आली. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा भाव ४१९ रुपयांनी वधारला. सध्या सोने ४१ हजार ५८२ रुपयांवर ट्रेड करत आहे. त्यामुळे सोने खरेदी करणा-यांना चांगलाच फटका बसणार आहे.

जागतिक बाजारात देखील सोने तेजीत आहे. गेल्या आठवड्यात सोने दरात मोठी घसरण झाली होती. सोन्याचा भाव ४० हजारांखाली गेला होता. मात्र मागील दोन दिवस चीनमधील करोनाचा प्रकोप कमी झाला आहे. त्याचबरोबर अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हने अर्थव्यवस्था सावरण्यासाठी पॅकेज घोषित करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे कमॉडिटी बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

सोमवारी जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीत ४ टक्के वाढ झाली होती. स्पॉट गोल्ड १.७ टक्क्यांनी वधारून १५७८.८३ डॉलर प्रती औंस इतके झाले. अमेरिकेत सोने १.६ टक्क्यांनी वधारून १५९२.२० डॉलर प्रती औंसपर्यंत पोहचले आहे. भांडवली बाजारात पोळलेले गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करत आहे. त्यामुळे बाजारात सोन्याचा भाव वधारत आहे.

चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयात वाढ झाली…

आज चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयात वाढ झाली. रुपया १५ पैशांनी मजबूत झाला. तो सध्या ७६.०७ वर ट्रेड करत आहे. त्याआधीच्या सत्रात रुपया ७६.२२ च्या सार्वकालीन नीचांकावर बंद झाला होता. सोमवारी कमॉडिटी बाजारात सोने ४१ हजार १६३ रुपयांवर बंद झाले होते. आज चांदीच्या दरात देखील ४.५६ टक्क्यांची वाढ झाली आहे. चांदीचा भाव ३९ हजार ६४२ रुपये आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments