दिल्ली विमानतळावर सोने तस्करी!

- Advertisement -

नवी दिल्ली:  दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ९२ लाख रूपयांच्या सोन्याची तस्करी करताना सीमा शूल्क अधिकाऱ्यांनी एका प्रवाशाला अटक केली आहे. संशयित प्रवाशी हा हाँगकाँगवरून दिल्लीला सोने घेऊन येत होता. त्यावेळी त्याला अटक करण्यात आली.

सीमा शूल्क विभागाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, अटक केलेल्या प्रवाशाकडे सुमारे तीन किलो सोने आढळून आले. हे सोने त्याने आपल्या पँटमध्ये विशिष्ट पद्धतीने बनवलेल्या खिशांमध्ये लपवले होते. या सोन्याची किंमत सुमारे ९१.८८ किलो असल्याचे सांगण्यात येते. याप्रकरणी चिनी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. या महिन्याच्या सुरूवातीलाच सीमा शूल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी भारतात १० किलो सोन्याची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असताना विमानतळावर चार चिनी नागरिकांना अटक करण्यात आली होती.

- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here