Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeदेशराज्यपालांनी महिला पत्रकाराचा गालगुच्चा घेतल्याने छी..थू…!

राज्यपालांनी महिला पत्रकाराचा गालगुच्चा घेतल्याने छी..थू…!

Tamil Nadu, Governorमहत्वाचे…
१. सेक्स फॉर डिग्री प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही
२. विनाकारण आपले नाव यामध्ये गोवले जातेय, हे सांगण्यासाठी पुरोहित यांची होती पत्रकार परिषद
३. मी माझा चेहरा भरपूरवेळा धुतला. पण अजूनही त्या स्पर्शापासून मुक्ती मिळालेली नाही


तामिळनाडू: तामिळनाडूच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या सेक्स फॉर डिग्री प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही. विनाकारण आपले नाव यामध्ये गोवले जातेय, हे सांगण्यासाठी तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मंगळवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली होती. पण ही पत्रकार परिषदेत संपतांना त्यांनी एक विचित्र कृती केली त्यामुळे ते नव्या वादात सापडले आहेत. संविधानीक पदावर बसलेल्या पुरोहितांनी असे कृत्य करणे चुकीचे आहे. याचा निषेध म्हणून एआयडीएमकेने घोषणाबाजी केली. पुरोहित अडचणीत आले आहेत.

राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांना त्यांच्याजवळ उभ्या असलेल्या एका महिला पत्रकराने प्रश्न विचारला. त्यावेळी राज्यपालांनी प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी त्या महिला पत्रकाराच्या संमतीविना तिच्या गालाला स्पर्श केला व गाल थोपटले. राज भवनात बोलवलेली ही पत्रकार परिषद आटोपून ते निघत असताना ही घटना घडली. यावेळी त्यांच्याभोवती पत्रकारांचा गराडा होता. लक्ष्मी सुब्रमण्यम असे या महिला पत्रकाराचे नाव असून त्या ‘द वीक’मध्ये काम करतात. मी बनवारीलाल पुरोहित यांना प्रश्न विचारला त्यावर त्यांनी उत्तर देणे अपेक्षित होते. पण त्यांनी उत्तर देण्याऐवजी माझे गाल थोपटले.

लक्ष्मी यांनी टि्वटवरुनही आपला संताप व्यक्त केला आहे. मी माझा चेहरा भरपूरवेळा धुतला. पण अजूनही त्या स्पर्शापासून मुक्ती मिळालेली नाही. तुमच्यादृष्टीने ही कृती कौतुकाची असेल पण माझ्यासाठी तुम्ही चुकीचेच आहात असे या टि्वटमध्ये म्हटले आहे. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तिकडून असे वर्तन अशोभनीय असल्याचे द्रमुकने म्हटले आहे.

दरम्यान सोमवारी तामिळनाडूच्या अरुप्पूकोट्टई येथील खासगी कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या निर्मला देवी या महिला प्राध्यापिकेला अटक करण्यात आली आहे. निर्मला देवी तिच्या कॉलेजमधील चार विद्यार्थीनींना मदुराई कामाराज विद्यापीठाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत लैंगिक संबंध ठेवायला सांगत होती. त्या बदल्यात चांगले मार्क आणि पैसे मिळतील अशी ऑफर तिने दिली होती. या प्रकरणात राज्यपालाचे नाव ओढले गेल्याने त्यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. याचे सर्वस्तरातेन निषेध व्यक्त करण्यात येत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments