Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशगुजरात सरकार शेतकरी विरोधी असल्याने अहिर समाज विरोधात

गुजरात सरकार शेतकरी विरोधी असल्याने अहिर समाज विरोधात

Ahir Community, BJP, Gujarat Polls

महत्वाचे…

१. गुजरातमध्ये अहिर समाजाची संख्या ३५ लाखापर्यंत
२. शेतमालाला योग्यभाव न मिळाल्यामुळे शेतकरी भाजपाला मतदान करणार नाही
३. गुजरातमधलाही शेतकरी अडचणीतच

गुजरात: गुजरातमध्ये ओबीसी समाजही मोठ्या प्रमाणात आहे, त्यातलाच एक समाज म्हणजे अहिर समाज. पण यावेळी अहिर समाजाने भाजपला हरवण्याचा चंगच बांधला आहे. भाजपने शेतमालाला योग्य भाव न दिल्याने हा समाज अडचणीत आला आहे. हा समाज मोठ्या प्रमाणात शेतकरी असल्यामुळे भाजपाच्या विरोधात मतदान करणार आहे.

गुजरातमध्ये ओबीसींमधला एक महत्वाचा समाज म्हणजे अहिर समाज. या समाज गुजरातमधल्या जुनागढ, पोरबंदर, गिर सोमनाथ आणि अमरेली या जिल्हयात मोठ्या प्रमाणात आहे. राज्यातील या समाजाची एकूण लोकसंख्या जवळपास ३० ते ३५ लाख इतकी आहे. हा समाज प्रामुख्याने शेती या व्यवसायात आहे. भारतीय जनता पक्षाच्या सरकारला शेतमालाला योग्य तो भाव मिळवून दिला नाही असा आरोप या समाजाचे अध्यक्ष गोविंदभाई चोचा यांनी केला आहे. राज्य सरकारनं शेतीकडे दुर्लक्ष केल्याने आम्ही अडचणीत आलो असल्याचं या समाजाचं म्हणणं आहे.

या समाजात भाजपविरोधात राग असण्याचं आणखी एक प्रमुख कारण म्हणजे आपल्या समाजाच्या व्यक्तीला जुनागढमधून भाजपनं नाकारलेली उमेदवारी. यानं आपल्या समाजाचा मान भाजपनं राखला नाही त्यामुळे त्यांना याची राजकीय किंमत येत्या निवडणुकीत चुकवावी लागेल असा इशारा या समाजाचे नेते देत आहेत. आपली ज्या भागात ताकद आहे तिथं भाजपला नमवण्यासाठी आपली ताकद लावायची असा चंगच या सामाजानं बांधला असल्याचं या समाजाच्या नेत्यांच्या बोलण्यातून नाराजी व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments