भाजपविरोधी भूमिकेमुळेच हार्दिक पटेलचे चारित्र्यहनन’- लालूप्रसाद

- Advertisement -

महत्वाचे…
१.मोदी सरकार विरोधकांच्या मुला-बाळांनाही सोडत नाही २. मोदी सरकार विरोधकांच्या मुला-बाळांवर निशाणा साधला


बिहार: पाटीदार नेता हार्दिक पटेल भाजपला आव्हान देत असल्यामुळेच त्यांची कथित सेक्स सीडी जारी करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी केला. मोदी सरकार विरोधकांच्या मुला-बाळांवर निशाणा साधत त्यांच्यामागे तपास यंत्रणांचा जाच सुरू करत आहे. पण वेळ बदलत असते, हे सत्य भाजपच्या नेत्यांनी समजून घेतले पाहिजे. आज आपल्या विरोधकांबरोबर जो व्यवहार ते करत आहेत. भविष्यात हे अस्त्र त्यांच्याविरोधातही वापरले जाऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला. रविवारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

हार्दिक पटेलशी आज बोलणं झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितले. तेजस्वी आणि मिसा भारती हार्दिकच्या संपर्कात असतात, असेही ते म्हणाले. लालूंनी नितीश कुमार यांच्यावरही निशाणा साधला. पाटीदार समाजाची मते विभागण्यासाठीच जेडीयू तेथे उमेदवार उभा करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधानांनी घोषित केलेल्या रकमेपैकी किती पैसे मिळाले हे नितीश कुमारांनी जाहीर करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

- Advertisement -

माध्यमांबाबत बोलताना ते म्हणाले, एकीकडे अमेरिकेत माध्यमं राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या चुका काढण्यात व्यस्त असतात. तर इकडे आपल्या देशात केंद्र सरकारच्या दबावात माध्यमं विरोधकांच्या चुका काढताना दिसतात. यावेळी त्यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा मुलगा जय शहा याच्याविरोधात ‘द वायर’ ने केलेल्या आरोपांचा उल्लेख केला. तसेच याप्रकरणी मानहानीचा दावा दाखल करण्याची भीती दाखवण्यात आल्याचे ते म्हणाले.

- Advertisement -