‘हेमंत विश्व शर्मांसारखा व्यक्ती मंत्री होणं हा दैवी अन्याय’-कपिल सिब्बल

- Advertisement -

महत्वाचे….
१.पाप केल्याने ककर्मरोग होतो अशी मुक्ताफळे आसामचे आरोग्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी उधळली होती २.
शर्मा यांनी शिक्षकांना संबोधित करताना अकलेचे तारे तोडले ३. शर्मा यांच्या वक्तव्याचा संताप


नवी दिल्ली: पाप केल्याने कर्करोग होतो, अशी मुक्ताफळे आसामचे आरोग्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी उधळल्यानंतर आता त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया येत आहेत. गेल्या वर्षी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल होऊन मंत्री झालेल्या विश्व शर्मा यांच्या विधानाची काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी जोरदार खिल्ली उडवली आहे. पाप केल्यामुळे कर्करोग होतो,’ असे म्हणणाऱ्या विश्व शर्मा यांना अशी व्यक्ती मंत्री होणे हा दैवी अन्याय आहे,’ अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी उत्तर दिले आहे.

‘हिंदू संस्कृतीनुसार प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्माचे फळ मिळते. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या पापांची शिक्षा मिळते. भूतकाळात केलेल्या चुकांची शिक्षा लोकांना मिळत असते,’ अशा शब्दांमध्ये विश्व शर्मा यांनी कर्करोग का होतो, याचे कारण सांगितले. त्यावेळी उपस्थितांना धक्काच बसला. ‘देव आपण केलेल्या पापांची शिक्षा देतो. तरुण मुलाला कर्करोग होतो किंवा त्याचा अपघात होतो. तुम्ही जर याची पार्श्वभूमी बघितली तर त्या व्यक्तींच्या वाईट कृत्यांमुळेच त्यांच्यावर ही वेळ ओढावते. हा दैवी न्याय आहे,’ असे शर्मा गुवाहाटीतील एका कार्यक्रमात म्हणाले.

- Advertisement -

शर्मा यांनी शिक्षकांना संबोधित करताना अकलेचे तारे तोडल्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ‘कर्करोग हा दैवी न्याय आहे. पापांमुळे होणारी ही शिक्षा आहे, असे आसामचे मंत्री शर्मा म्हणाले. पक्षांतर केल्यानेही असेच होते,’ असे ट्विट चिदंबरम यांनी केले. चिदंबरम यांच्यासोबतच माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनीही शर्मा यांच्या विधानाची खिल्ली उडवली. ‘पाप केल्याने कर्करोग होतो. हा दैवी न्याय आहे, असे हेमंत विश्व शर्मा म्हणतात. मात्र अशी व्यक्ती मंत्री होणं हा दैवी अन्याय आहे,’ अशा शब्दांमध्ये सिब्बल यांनी शर्मा यांनी टोला लगावला.

- Advertisement -