हिंदू आहात तर भाजपला मतदान करा, भाजप उमेदवाराचे अजब आवाहन!

- Advertisement -

अलवर – लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. जसवंत यादव यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये जसवंत यादव धर्माच्या नावावर मते मागत असल्याचे समोर आले आहे. या व्हायरल व्हिडिओनंतर विरोधकांनी जयवंत यादव यांना चांगलेच धारेवर धरले आहे.

मेवातच्या गावांमध्ये जसवंत यादव गेले असता,तिथे गावकऱ्यांनी त्यांना ‘आम्ही तुम्हाला मत देऊ पण भाजपला नाही’ असे सुनावले. तेव्हा भाजप हिंदूंचा पक्ष आहे, जर हिंदू असाल तर भाजपला मत द्या, मुस्लीम असाल तर काँग्रेसला मत द्या, असे यादव म्हणाले. याच वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
या प्रचार सभेवेळी यादवांच्या कार्यकर्त्यांनी आचारसंहितेचा भंग केला. निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी गावकऱ्यांनी गाड्या घेऊन या, आम्ही पैसे देऊ, असे भाजप कार्यकर्ते देवेंद्र यादव यांनी गावकऱ्यांना म्हटले. या व्हायरल व्हिडिओमुळे जसवंत यादवांवर सर्व स्तरातून टीका होत आहे. आता भाजप आणि निवडणूक आयोग जसवंत यादवांवर काय कारवाई करते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

- Advertisement -