हैदराबाद : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून गंभीर दखल; घटनास्थळाच्या तपासाचे आदेश

- Advertisement -

nhrc,National Human Rights Commission,Human Rightsनवी दिल्ली: हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचे शुक्रवारी पहाटे पोलिसांनी एन्काऊंटर केले. याप्रकरणी उलट-सुलट प्रतिक्रिया उमटल्या. या प्रकरणाची गंभीर दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली. तसेच विशेष पथकाला घटनास्थळाची पाहणी करुन चौकशी अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

यासंदर्भात तपास विभागाच्या पोलीस उपमहासंचालकांच्या नेतृत्वाखील आयोगाने एक पथक तयार केले असून या पथकाला एन्काऊंटर झालेल्या घटनास्थळाला तातडीने भेट देऊन या घटनेतील तथ्य तपासण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची गंभीर दखल घेत संदर्भात सुओमोटो याचिका दाखल करुन घेतली. तसेच तातडीने घटनास्थळी जाऊन चौकशीचे आदेशही दिले.

- Advertisement -