Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeदेश'लष्करामध्ये सैनिक आहात तर जीव जाणारच : खा. नेपाल सिंह

‘लष्करामध्ये सैनिक आहात तर जीव जाणारच : खा. नेपाल सिंह

उत्तरप्रदेश: देशाचं रक्षण करताना मृत्यूला कवटाळणाऱ्या भारतीय सैनिकांबद्दल भाजपच्या एका खासदाराने मुक्ताफळे उधळली आहेत. लष्करामध्ये सैनिक आहात तर जीव जाणारच,’ असं वक्तव्य भाजप खासदारानं केलं आहे. त्यामुळं सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
नेपाल सिंह असं या खासदाराचं नाव असून ते उत्तर प्रदेशातील रामपूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात.

‘लष्करात असल्यामुळे सैनिकांना रोज मरण येणारच ना? दोन देशांतील लढाईत सैनिक मरत नाहीत, असा कोणता देश आहे का? गावातही दोन गटांमध्ये हाणामारी झाली तर एखादा जखमी होतोच,’ असंही नेपाल सिंह म्हणाले. या वादग्रस्त वक्तव्यानंतर नेपाल सिंह यांनी एक धक्कादायक प्रश्नही मीडियाला विचारला. ‘माणसाचं मरण थांबवेल असं कुठलं यंत्र आहे का?, बंदुकीच्या गोळीला निष्प्रभ करेल, असं एखादं उपकरण आहे का?,’ असा सवालही त्यांनी केला. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments