Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeदेशराजस्थानमध्ये जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत चारही जागा काँग्रेसकडे

राजस्थानमध्ये जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत चारही जागा काँग्रेसकडे

महत्वाचे…
१.भाजपची उलटी गिनती सुरू झाल्याचे सचिन पायलट यांनी म्हटले २. २७ पैकी १६ पंचायत समिती आणि सहा नगरपालिकांवर जागांवर विजय ३. काँग्रेस नेत्यांचा निकालामुळे आत्मविश्वास वाढला


राजस्थान: गुजरात विधानसभा निवडणुकीतील चांगल्या कामगिरीनंतर काँग्रेसला मंगळवारी राजस्थानमधून आनंदाची बातमी मिळाली. राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीत जिल्हा परिषदेच्या जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. त्याचबरोबर २७ पैकी १६ पंचायत समिती आणि सहा नगरपालिकांवर जागांवर विजय मिळवला. तर सत्ताधारी भाजपला १० पंचायत समिती आणि सात नगरपालिकातील जागा मिळवण्यात यश आले.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार चार जिल्हा परिषद पैकी मागील निवडणुकीत एक जागा भाजपकडे होती. जी यंदा काँग्रेसच्या पारड्यात गेली. स्थानिक निवडणुकीतील १९ जिल्ह्यातील २७ पंचायत समिती, १२ जिल्ह्यातील १४ नगरपालिका व चार जिल्हा परिषद जागांसाठी १७ डिसेंबर रोजी मतदान झाले होते.  भाजपची उलटी गिनती सुरू झाल्याचे पोटनिवडणुकीच्या निकालाने दाखवून दिल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी सांगितले. मागील चार वर्षांपासून काँग्रेस जनतेच्या अडचणी समोर आणण्याचे काम करत आहे. त्यामुळे सामान्य जनतेमध्ये काँग्रेसप्रती विश्वास वाढत आहे. आगामी अलवर आणि अजेमर लोकसभा तसेच मांडलगड विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही काँग्रेसचा विजय होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

स्थानिक निवडणुकीच्या निकालात मुख्यमंत्री वसुंधरा यांचा मुलगा आणि खासदार दुष्यंत सिंह यांचा गड असलेल्या बारा जिल्ह्यातील दोन वॉर्डमधील सत्ताधारी भाजपचा पराभव धक्कादायक असल्याचे मानले जाते. परंतु, भाजपचे प्रदेश प्रवक्ते आनंद शर्मा यांनी मात्र स्थानिक निवडणुकांचे निकाल पक्षासाठी चांगले आल्याचे म्हटले. काँग्रेसच्या अनेक जागा भाजपने हिसकावल्याचे त्यांनी म्हटले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments