Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशभारत अवकाशात शुक्रवारी ३१ उपग्रह सोडणार!

भारत अवकाशात शुक्रवारी ३१ उपग्रह सोडणार!

बंगळुरु – भारत कार्टोसॅटसह ३१ उपग्रह १२ जानेवारी (शुक्रवारी) सकाळी साडेनऊ वाजता अवकाशात सोडणार आहे. प्रथम १० जानेवारीला हे उपग्रह अवकाशात सोडण्याचे नियोजन होते. कार्टोसॅट हा भारतीय उपग्रह असून या सोबतच २८ अमेरिकेचे तर ५ इतर देशाचे उपग्रह असल्याची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे प्रवक्ते प्रसाद कर्णिक यांनी दिली.

कर्णिक पुढे म्हणाले, की जानेवारी १० ही अंदाजे ठरविलेली तारीख होती. यामुळे आमच्या नियोजनाला उशिर झाला असे समजू नये. हे प्रक्षेपण आंध्र प्रदेशमधील श्रीहरीकोटा येथून होणार आहे. २०१८ मध्ये इस्रो पोलार लाँच व्हेईकल (पीएसएलव्ही-सी४०) चे प्रक्षेपण करण्याचा विचार आहे. मागील ऑगस्टमध्ये ८ उपग्रहाचे प्रक्षेपण अयशस्वी झाले होते. या प्रक्षेपण होणाऱ्या उपग्रहात लहान आणि मोठ्या वजनाची उपग्रहे आहेत.

कार्टोसॅटचे उपयोग…
कार्टोसॅट उपग्रह हे उच्च दर्जाची पृथ्वीवरील छायाचित्रे घेऊ शकतो, याचा उपयोग ग्रामिण आणि शहरी भागाच्या विकासासाठी होणार, समुद्रातील दळणवळणासाठी, तसेच रस्त्यावरील वाहतूक नियोजनासाठीही याचा उपयोग करता येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments