Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeदेशभारताचा विकासदर घसरला; वर्ल्ड बँक

भारताचा विकासदर घसरला; वर्ल्ड बँक

India's growth rate has dropped; World Bank
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) नंतर वर्ल्ड बँकेच्या ताज्या अहवालाने केंद्र सरकारची पोलखोल झाली. आर्थिक वर्षाच्या विकासदरात आणखी घसरण होणार असल्याचा अंदाज वर्ल्ड बँकेने व्यक्त केला आहे.

भारताचा विकासदर २०१९-२० मध्ये ६ टक्क्यांपर्यंत घसरेल, असं वर्ल्ड बँकेनं म्हटलंय. गेल्या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर हा ६.९ टक्के इतका होता. तर २०२२ पर्यंत भारताचा आर्थिक विकासदर हा ७.२ टक्क्यांपर्यंत जाईल, असा दावा सरकारकडून केला जात होता.

IMF ने याच आठवड्यात भारताचा या वर्षाचा आर्थिक विकासदर घसरणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. IMF ने ०.३० टक्क्यांनी घटवून विकासदर आता ७ टक्के इतका वर्तवला आहे. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने भारताचा विकासदर ६.८ टक्क्यांवरून घसरून ६.१ टक्के इतका अंदाज वर्तवला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments