Friday, March 29, 2024
Homeदेशभारतातील सर्वात आवडते मद्य 'ओल्ड माँक'च्या निर्मात्याचे निधन!

भारतातील सर्वात आवडते मद्य ‘ओल्ड माँक’च्या निर्मात्याचे निधन!

नवी दिल्ली – भारतातील सर्वात लोकप्रिय मद्य असलेल्या ‘ओल्ड माँक’चे निर्माते ब्रिगेडियर (सेवानिवृत्त) कपिल मोहन यांचे निधन झाले आहे. ते ८८ वर्षांचे होते. कपिल मोहन ‘मोहन मेकिन’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक देखील होते.

गाझियाबाद येथील निवासस्थानी त्यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते गेल्या वर्षभरापासून आजारी होते. कपिल मोहन हे स्वतंत्र भारतातील पहिले मद्य सम्राट होते. जालियनवाला बाग हत्याकांडातील जनरल डायरचे वडिल एडवर्ड डायर यांनी १८५५ मध्ये हिमाचलमधील कसौली येथे डायर बियर या कंपनीची स्थापना केली होती. स्वातंत्र्यानंतर मोहन यांच्या कुटुंबाने डायर यांची कंपनी विकत घेतली आणि याला नाव दिले मोहन मेकिन.
कपिल मोहन यांचे वडील ए.एन. मोहन यांनी ‘ओल्ड माँक’ हा रमचा ब्रँड बाजारात आणला. त्यावेळी कपिल मोहन भारतीय लष्करात कार्यरत होते. सैन्यातून निवृत्त झाल्यावर त्यांनी त्यांच्या वडिलांच्या कंपनीची जबाबदारी स्विकारली. ‘ओल्ड माँक डार्क रम’ चे श्रेय कपिल मोहन यांनाच जाते. कपिल यांनी पदभार स्विकारल्यानंतर कंपनीत आमुलाग्र बदल केले. आज ओल्ड माँक रम जगभरातील ५० पेक्षा जास्त देशांमध्ये विकली जाते. २०१० साली कपिल मोहन यांना केंद्र सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने देखील गौरवण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments