Placeholder canvas
Tuesday, April 16, 2024
Homeदेशआसामात इंटरनेट बंद; मोदीजी तुमचं ट्विट कोण वाचणार? काँग्रेसचा सवाल

आसामात इंटरनेट बंद; मोदीजी तुमचं ट्विट कोण वाचणार? काँग्रेसचा सवाल

नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून आसाम पेटले आहे. लोकांना शांत राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शांततेचे आवाहन करण्यासाठी ट्विट केले आहे. काँग्रेसने या ट्विटवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. आसाममध्ये इंटरनेट सेवा बंद असताना पंतप्रधान मोदींनी ट्विट केले आहे. हे ट्विट कोण वाचणार?, अशा शब्दात काँग्रेसने मोदींवर टीका करुन सवाल केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आसामच्या नागरिकांसाठी केलेल्या ट्विटला रिप्लाय देताना काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट केले आहे. काँग्रेसने मोदींचे हे ट्विट रिट्विट केले असून त्याला उत्तर दिले आहे. आसाममध्ये सध्या आमचे बहीण – भाऊ तुमचे आवाहन करणारे ट्विट वाचू शकत नाहीत मोदीजी. कारण तुम्ही विसरला आहात की आसाममध्ये इंटरनेट वर बंदी असून तेथील इंटरनेट सेवा बंद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले होते. त्यात त्यांनी म्हटले की, मी आसाममधील आपल्या बहीण – भावाला आवाहन करतो की, कॅब (नागरिकता संशोधन विधेयक) वरून कोणालाही चिंता करण्याची आवश्यकता नाही. मी सर्वांना आश्वासन देतो की, कोणीही तुमचे अधिकार, विशिष्ट ओळख आणि सुंदर संस्कृती हिसकावू शकत नाही. हे सर्व आधीप्रमाणेचे वेगवान आणि विकसित राहिल, असे मोदींनी ट्विटरवरून म्हटले होते.

नागरिकत्व संशोधन विधेयकावरून उसळलेला हिंसाचार रोखण्यासाठी तसेच राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आसाममधील १० जिल्ह्यात मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. आसाममधील लोकांना शांततेचे आवाहन करताना पंतप्रधान म्हणाले, ‘मी विशेषत: माझ्या आसामच्या भावंडांना आश्वासन देतो की कोणीही त्यांचा हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आम्ही त्यांचा राजकीय वारसा, भाषा आणि संस्कृती जपण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी आसामच्या भावंडांना नेहमी कार्य करू. तेथील तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भारत सरकार पूर्ण जोमाने खांद्याला खांदा लावून काम करेल. मी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी दिशाभूल होऊ नये, असे आवाहन करतो, असं मोदींनी म्हटलं होतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments