Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeदेशबीबीसी वर आयकर विभागाचे छापे; 'भाजपचा रडीचा डाव' म्हणत विरोधक आक्रमक

बीबीसी वर आयकर विभागाचे छापे; ‘भाजपचा रडीचा डाव’ म्हणत विरोधक आक्रमक

बीबीसी मीडियाविरोधात केलेली कारवाई हि सुडाच्या भावनेने केली आहे का? तसेच अडाणी गैरव्यवहारपासून देशाचे लक्ष्य विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे का? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला.

Income Tax conducted raids on BBC officesआयकर विभागाने मंगळवारी सकाळी ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग मीडियाच्या ( बीबीसी ) मुंबई आणि दिल्ली येथील कार्यालयांवर कथित करचुकवेगिरी प्रकरणी छापेमारी केली.

आयकर विभागाने केलेल्या कारवाईनंतर देशभरात एकाच खळबळ उडाली असून विरोधकांनी आयकर विभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उभे करत केंद्र सरकारवर निशाणा साधला.

देशभरात कथित अडाणी गैरव्यवहार प्रकरण चर्चेत असताना विरोधक सातत्याने अडाणी उद्योगसमूहाविरोधातआवाज उठवत तपास करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करीत आहेत. परंतु, केंद्रीय तपास यंत्रणांनी बीबीसी मीडियाविरोधात केलेली कारवाई हि सुडाच्या भावनेने केली आहे का? तसेच अडाणी गैरव्यवहारपासून देशाचे लक्ष्य विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे का? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला.

काही दिवसांपूर्वीच बीबीसी ने युट्युबवर २००२ साली घडलेल्या गुजरात दंगलीवर आधारित “इंडिया: द मोदी क्वेश्चन” हा माहितीपट प्रदर्शित केला होता. ह्या माहितीपाटातून तत्कालीन गुजरात सरकारवर आणि मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर कथित गैरकारभारप्रकारानी ताशेरे ओढले आहेत. हा माहितीपट प्रदर्शित झाल्यानंतर जगभरात चर्चेचा विषय ठरला. केंद्र सरकारने माहितीपट प्रदर्शित झाल्याच्या काही दिवसातच त्यावर बंदी आणली. केंद्र सरकारच्या या निर्णयावर देशभरातून टीका करण्यात आली. त्यातच, बीबीसी मीडियाच्या कार्यालयांवरील आयकर विभागाच्या छापेमारीनंतर केंद्र सरकारवर चहूबाजूंनी टीकेला सामोरे जावे लागत आहे.

मुंबई माणूस ने विरोधी पक्षातील काही नेत्यांबरोबर ह्याबाबत चर्चा करून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

काँग्रेस प्रवक्ता सचिन सावंत यांनी केंद्र सरकारवर टीका करत ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ असे म्हंटले आहे.
त्यांनी पुढे सांगितले कि, “मोदी सरकार बीबीसी मीडियावर अशा प्रकारच्या कारवाया करून जगाला त्यांचा खरा चेहरा दाखवत आहेत.”

ज्येष्ठ काँग्रेस नेते रत्नाकर महाजन म्हणाले कि केंद्र सरकार सूडबुद्धीने काम करीत आहे.
“बीबीसीच्या माहितीपटाला घाबरून आणि केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत बीबीसीविरोधात सूडाच्या भावनेने प्रतिशोध घेण्यासाठी मोदी सरकारने हि कारवाई केली आहे.”

आम आदमी पक्षाचे नेते धनंजय शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत म्हंटले कि, “आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांना त्याचा पराभव स्पष्टपणे दिसत आहे आणि म्हणूनच ते अशी पावले उचलत आहेत.”

“बीबीसी हा भारतीय गोदी मीडिया नसून एक आंतरराष्टीय मीडिया आहे याचे भान भाजप सरकारला नसावे. त्यांच्या या कृतीनंतर जगासमोर भारताचे हसू झाले आहे,” असे ते पुढे म्हणाले.

 

Web Title: IT Raids on BBC; Opposition called BJP Fascist

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments