Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeदेश'जिजाऊ जन्मोत्सवात' जनतेशी संवाद साधणार, केजरीवालांचे मराठी ट्विट!

‘जिजाऊ जन्मोत्सवात’ जनतेशी संवाद साधणार, केजरीवालांचे मराठी ट्विट!

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपण राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त सिंदखेड राजा येथे जनतेशी संवाद साधायला येत असल्याचे म्हटले आहे. मराठीतून ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी केजरीवाल यांना सिंदखेड राजा येथे सभेसाठी परवानगी नाकारली आहे.

कायदा व सुव्यस्थेच्या कारणावरुन पोलिसांनी केजरीवाल यांना विदर्भातील सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सभेसाठी परवानगी नाकारली होती. १२ जानेवारीला केजरीवाल राजमाता जिजाऊ यांच्या दर्शनासाठी सिंदखेड राजा येथे येणार होते. येथे ते एका सभेला संबोधित करणार होते. सिंदखेड राजा येथे दरवर्षी ११ व १२ जानेवारीला राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावेळी लाखो लोक राजमाता जिजाऊंच्या दर्शनासाठी हजेरी लावतात. यंदा चार ते पाच लाख लोक येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, केजरीवाल यांना दर्शनासाठी परवानगी देण्यात आली आहे. पोलिसांनी केजरीवाल यांच्या सभेसाठी परवानगी नाकारली असतानाही केजरीवाल यांनी आपण सिंदखेड राजा येथे जनतेशी संवाद साधायला येत असल्याचे म्हटल्याने, त्यांची सभा होणार की नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments