Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeदेशचार वर्षांच्या चिमुरडीला खाऊचे आमिष दाखवून बलात्कार

चार वर्षांच्या चिमुरडीला खाऊचे आमिष दाखवून बलात्कार

जोधपूर:  कठुआ, उणावा, सुरत मधील घटनांनी जग सुन्न झाला. जनता रस्त्यावर उतरुन फाशीची शिक्षा द्या मागणी करत आहेत. असे असंताना सुध्दा बलात्काराच्या घटना दररोज घडत आहेत. आता राजस्थानातही बलात्काराची आणखी एक घटना घडल्याचे समोर आले आहे. जोधपुर येथे एका चार वर्षाच्या चिमुरडीला खाऊच्या आमिषाने निर्जनस्थळी घेऊन गेल्यावर दोन नराधमांनी तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली.  

जोधपुर येथील सहाय्यक पोलिस आयुक्त कमल सिंग यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, चार वर्षाच्या एका मुलीला खाऊ देण्याच्या अमिषाने एकांतात बोलवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. पीडितेच्या वडिलांनी शास्त्रीनगर परिसरातील दोन लोक मुलीला खाऊचे आमिष दाखवून घेऊन गेले होते. तिच्यावर बलात्कार केला अशी तक्रार दिली.

दोन्ही आरोपींविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार दोन्ही आरोपी हे बिहारचे राहणारे आहेत. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments