त्रिपुरात जवानाकडून पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या

- Advertisement -

त्रिपुरा: त्रिपुरात आणखी एका पत्रकारची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. मागील दोन महिन्यातील ही दुसरी घटना आहे. सुदीप दत्ता भौमिक असे मृत पत्रकाराचे नाव असून त्रिपुरा स्टेट रायफल्सच्या (टीएसआर) जवानाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. आगरतळा येथून २० किमी अंतरावर असलेल्या आरके नगर येथे ही घटना घडली.

भौमिक हे ज्येष्ठ पत्रकार असून एका वृत्तपत्रात ते काम करत. ते आरके नगर येथील सेकंड टीएसआर कमांडटची यांची वेळ घेऊन भेटायला गेले होते. त्यावेळी कमांडंटच्या कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या जवानाबरोबर भौमिक यांचा वाद झाला. चिडलेल्या जवानाने अचानक त्यांच्यावर गोळी झाडली. भौमिक जागीच ठार झाले, अशी माहिती बंगाली वृत्तपत्र स्यानदान पत्रिकाचे संपादक सुबेल डे यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिली.

भौमिक यांचा मृतदेह आगरतळा येथे आणण्यात आला असून पोलिसांनी संशयित जवानाला अटक केली आहे. यापूर्वी २० सप्टेंबर रोजी दिन-रात या स्थानिक वृत्त वाहिनीचे पत्रकार शंतनु भौमिक यांचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. कम्युनिस्ट आणि आयपीएफटी समर्थकांमध्ये झालेल्या झटापटीत ही घटना घडली होती.

- Advertisement -
- Advertisement -