Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeदेशभाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची ‘हा’ नेता सुत्रे स्वीकारणार

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची ‘हा’ नेता सुत्रे स्वीकारणार

जे.पी. नड्डा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारणार

JP Nadda

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहेत. भाजपचे कार्यअध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद दिले जाणार आहेत. नड्डा हे १९ फेब्रुवारीला अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहे.

अमित शाह यांनी गृहमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर जे.पी.नड्डा यांच्याकडे कार्यअध्यक्षपदाचा पदभार देण्यात आला होता. भाजपच्या केंद्रीय बोर्डाने १७ जूनला नड्डांची निवड केली होती. विशेष म्हणजे नड्डा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे निकटवर्ती मानले जातात.

नड्डा यांच्या नेतृत्वाखाली २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचं अभियान चालवण्यात आलं होतं. २०१९ मध्ये उत्तर प्रदेशचं प्रभारी पद नड्डांकडे देण्यात आलं होतं. त्यावेळी समाजवादी पक्ष आणि बसपाची युती असतांनाही भाजपला उत्तरप्रदेशमध्ये ६२ जागांवर दणदणीत विजय मिळवून दिला होता. त्यावेळी अमित शाह यांनी प्रत्येक जागेवरं ५० टक्के मतदान मिळण्याचं टार्गेट ठेवण्यात आलं होतं. त्या वेळी ४९.६ टक्के वोट मिळवून देण्यात यश मिळालं होतं.

कोण आहेत जे.पी.नड्डा….

जय प्रकाश नड्डा ( जे.पी.नड्डा ) मुळचे हिमाचल प्रदेशच्या बिलासपुरचे रहिवाशी आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून राजकीय कारर्कीदीला सुरुवात केली होती. १९९३ मध्ये हिमाचल प्रदेशमधून आमदारकी मिळवली होती. १९९४ ते १९९८ विधानसभेचे नेतेपद भूषविले आहे. राज्य आणि केंद्रीय मंत्री म्हणून कामकाज बघितले. २००७ मध्ये प्रेम कुमार धूमल सरकारमध्ये पर्यावरण, विज्ञान आणि टेक्नॉलजी मंत्रीपदावर काम केलं. २०१२ मध्ये राज्यसभा सदस्यपदी निवड झाली. तर २०१४ मध्ये मोदी सरकारमध्ये त्यांनी आरोग्य, कुटुंब कल्याण मंत्रीपदी कामाचा अनुभव आहे. चांगले वक्ते म्हणूनही नड्डा यांची ओळख आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments