कोणताही शाह देशावर ‘हिंदी’ भाषेची सक्ती करू शकत नाही – कमल हसन

- Advertisement -

गृहमंत्री मंत्री अमित शहा यांनी याबाबत भाष्य केले आहे. हिंदी दिना निमित्त बोलताना त्यांनी ‘एक देश एक भाषा’ करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावरुन गदारोळ उडाला आहे.

याबाबत अमित शहा यांनी ‘प्रत्येकाने जास्तीत जास्त हिंदीचा वापर केला पाहिजे. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. विशेषतः ईशान्येकडील राज्यांमध्ये प्रत्येक मुलाला हिंदी शिकवली पाहिजे. सध्या त्याचे प्रमाण कमी आहे. तसेच भारत विविध भाषेचा देश आणि प्रत्येक भाषेची एक विशिष्ट ओळख आहे. मात्र आपल्या देशात एक भाषा असणे आवश्यक आहे ज्याने जगात भारताला ओळखले जाईल. आज देशाला बांधून ठेवण्यात हिंदी भाषेचे फार मोठे योगदान आहे, असे विधान अमित शहा यांनी केले होते.

- Advertisement -

या विषयी कमल हसन यांनी ‘अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या देशाच्या एकतेसाठी त्याग केला आहे. मात्र, लोक आपली भाषा, संस्कृती आणि ओळख विसरू शकत नाहीत. भारत एक असा देश आहे, त्याठिकाणी लोक एकत्र बसून जेवण करतात. कोणावर काही लादू शकत नाही.

तसेच नवीन कायदा लागू करण्याआधी सामान्य लोकांशी चर्चा केली पाहिजे असं विधान केले आहे.

- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here