Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशकमल हसनचा मक्कल निधी मय्यम पक्ष!

कमल हसनचा मक्कल निधी मय्यम पक्ष!

मुदैर: अभिनेता कमल हसनने आता राजकारणात सक्रिय प्रवेश केला  आहे. आज मदैरमध्ये पक्षाचे नाव मक्कल निधी मय्यम असे जाहीर केले. यामुळे तामिळ नाडूच्या राजकारणात  कमल हसन चा पक्ष काय जादू करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

कमल हसनने खूप आधीच आपण राजकारणात येणार असल्याची  घोषणा केली होती. रजनीकांतनेसुद्धा आपण राजकारणात येणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. आता त्यादृष्टीने पहिलं पाऊलंच कमल हसनने टाकलं  आहे . आज  दिल्लीचे  मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित होते. जयललिता यांच्या मृत्यूनंतर तामिळ नाडूच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. ही कोण भरणार असा प्रश्नही उपस्थित झाला होता. पण आता रजनीकांत आणि कमल हसन हे दोघंही तामिळ नाडूच्या राजकारणाला पुढे नेणार असं चित्र दिसतंय. त्यामुळे तामिळ नाडूच्या   २०२१ च्या निवडणुकीत कोण बाजी मारतं  हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मक्कल निधी मय्यम या शब्दांचा अर्थ लोकांच्या न्यायाचा पक्ष किंवा ठिकाण असा होतो. हा लोकाचांच पक्ष आहे  असं विधान आज कमल हसनने केलं आहे. हा पक्ष येता बराच काळ तामिळ नाडूच्या राजकारणात राहणार असून हा पक्ष  निश्चितच  बदल घडवून आणेल  असं कमल हसनने स्पष्ट केलं आहे. आपल्या भाषणात भ्रष्टाचार हा मुख्य शत्रू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं  आणि इतक्या लांबून येऊन या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवल्या बद्दल अरविंद केजरीवाल यांचे आभार मानले. आता हा पक्ष तामिळ नाडूच्या राजकारणात काब बदल घडवतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments