Friday, March 29, 2024
Homeदेशकमलनाथ सरकारची सोमवारी अग्निपरिक्षा!

कमलनाथ सरकारची सोमवारी अग्निपरिक्षा!

Madhya Pradesh chief minister Kamal Nath, kamal nath, madhya pradesh floor test, kamal nath government floor test, floor test, madhya pradesh government crisis, congress, jyotiraditya scindiaनवी दिल्ली : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांची सोमवारी अग्निपरिक्षा होणार आहे. राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना १६ मार्च रोजी सभागृहात विश्वासमत सादर करण्यासाठी सांगितलंय. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा कमलनाथ सरकारकडे लागल्या आहेत.

राज्यपालांच्या अभिभाषणानंतर कमलनाथ यांना विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, १६ मार्चपासून मध्य प्रदेशचे अधिवेशन सुरु होणार आहे. मध्य प्रदेशमध्ये विधानसभा अध्यक्षांनी ६ आमदारांचा राजीनामा स्वीकारलाय. हे सर्व आमदार ज्योतिरादित्य सिंधियांचे समर्थक आहेत. त्यांनी काँग्रेसमध्ये परतण्यास नकार दिला. हे सर्व सरकारमध्ये मंत्री होते. मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या शिफारशीनंतर कालच राज्यपालांनी पदावरुन त्यांची हकालपट्टी केली.

राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ आणि विधानसभा अध्यक्ष यांना पत्र पाठवून सोमवारी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार आहे असे सांगितले आहे. राज्यपालांनी पत्रात स्पष्ट लिहिले आहे की, सभागृहात सरकारने बहुमत गमावले आहे. त्यामुळे घटनात्मक आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी सरकारने बहुमत सिद्ध करणे आवश्यक आहे.

सीएम कमलनाथ आणि सभापतींना लिहिलेल्या पत्रात राज्यपालांनी आदेश दिले आहेत की १६ मार्चपासून अर्थसंकल्प सुरू होणार आहे. त्यामुळे अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणानंतर बहुमत चाचणी घेण्यात येईल. या चाचणीचे चित्रीकरण देखील करण्यात येणार आहे. राज्यपाल लालजी टंडन यांनी हा आदेश भाजपच्या शिष्टमंडळाला भेट दिल्यानंतर हा आदेश दिला आहे. या भेटीमध्ये फ्लोर टेस्टची मागणी करण्यात आली होती.

सभागृहात एकूण आमदारांची संख्या २०६ असून आणि बहुमतासाठी १०४ आमदारांना पाठिंबा गरजेचा आहे. परंतु या परिस्थितीत कॉंग्रेसकडे केवळ ९२ आमदार शिल्लक राहतील आणि बिगर-भाजपा आणि बिगर-कॉंग्रेसच्या आमदारांच्या पाठिंब्यानंतर ही संख्या ९९ वर पोहचेली. अशा परिस्थितीत भाजप सहजपणे सरकार स्थापन करेल, कारण विधानसभेत भाजपाला १०७ आमदारांचा पाठिंबा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments