Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशकर्नाटकात ब्लास्ट 8 जण ठार, मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता

कर्नाटकात ब्लास्ट 8 जण ठार, मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता

शिवमोगा(कर्नाटक): जिलेटीनच्या कांडयांनी भरलेल्या ट्रकच्या स्फोटात आठ खाण कामगार ठार झाले आहेत. कर्नाटकाच्या शिवमोगा जिल्ह्यातील उनासोंडी येथील दगड खाणीत गुरुवारी रात्री ही दुर्देवी घटना घडली. रात्री अंधाराची वेळ असल्याने नेमका किती जणांचा मृत्यू झाला, ते स्पष्ट होऊ शकलेले नाही. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

दुर्घटना घडली त्या खाणीत पोलिसांना अजून जाता आलेले नाही. घटनास्थळावरुन जी माहिती मिळतेय, त्यानुसार ट्रकमध्ये जिलेटीनच्या कांड्या किंवा खाणीत दगड फोडण्यासाठी लागणारे साहित्य भरलेले होते.

दुर्घटनेच्यावेळी ट्रक एका जागी उभा होता व मजूर विश्रांती घेत होते. दगड खाणीमध्ये झालेला हा स्फोट इतका शक्तीशाली होता की, ३० किलोमीटरच्या परिसरातील अनेक खिडक्यांच्या काचा फुटल्या व इमारतींचे नुकसान झाले.

शिवमोगामधील या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केले आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली आहे स्फोटाची झळ बसलेल्या सर्वांना राज्य सरकार सर्व आवश्यक सहकार्य करत आहे असे पंतप्रधान मोदींनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments