Friday, March 29, 2024
Homeदेशकर्नाटक: उद्या ४ वाजेपर्यंत बहुमत सिध्द करा सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

कर्नाटक: उद्या ४ वाजेपर्यंत बहुमत सिध्द करा सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

नवी दिल्ली: येडियुरप्पा यांनी काल कर्नाटक मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. कर्नाटक सत्तास्थापनेचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. यावर सुनावणी करताना न्यायालयाने उद्या सायंकाळी ४ वाजता बहुमत सिध्द करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाला काँग्रेसने ऐतिहासिक निर्णय असल्याचे म्हटले आहे.

काँग्रेस-जेडीएसने दाखल केलेल्या याचिकेवर आज सकाळी साडेदहा वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. यावेळी न्यायालयाने भाजपचे वकील मुकुल रोहतगी यांच्याकडे राज्यपालांना दिलेल्या पत्राची विचारणा केली. रोहतगी यांनी न्यायालयासमोर २ पत्रे सादर केली आहेत. राज्यपालांनी येडियुरप्पांना दिलेले सत्तास्थापनेचे निमंत्रण आणि अँग्लो-इंडियन प्रतिनिधीच्या नियुक्ती निर्णयाविरोधात याचिकेतून आव्हान देण्यात आले आहे. यावर न्यायालयाने अँग्लो-इंडियन प्रतिनिधीच्या नियुक्ती करण्यास स्थगिती दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments