सुरक्षित संबंधांसाठी कंडोम वापरात कर्नाटक अव्वल!

- Advertisement -

महत्वाचे…
१. एड्स रोखण्यासाठी कंडोम प्रभावी माध्यम २. भारतात कंडोमचा वापर कमी ३. ऑनलाइन फ्री कंडोम ऑर्डर बुकींग करणाऱ्यांची तोबा गर्दी


नवी दिल्ली : सुरक्षित संबंधांसाठी कंडोमचा वापर करण्यामध्ये भारत अजूनही पिछाडीवरच असल्याचं पाहायला मिळतं. भारतामध्ये फक्त ५ टक्केच लोकं कंडोम वापरतात. ब्रिटनमध्ये हा आकडा ३० टक्के एवढा आहे. कर्नाटकसारख्या शिक्षित राज्यामध्ये तर कंडोम वापरणाऱ्यांची संख्या फक्त १.७ टक्के आहे. कोलकात्यामध्ये १९ टक्के, बंगळुरूमध्ये ३.६ टक्के आणि दिल्लीमध्ये १० टक्के लोकं कंडोम वापरतात.

भारतामधली कंडोम वापरणाऱ्यांची संख्या कमी असली तरी मागच्या काही दिवसांमध्ये कंडोमची ऑनलाईन विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. फक्त दिल्ली आणि कर्नाटकनंच मागचे सगळे रेकॉर्ड तोडून टाकले आहेत. याठिकाणी ऑनलाईन फ्री कंडोम स्टोरवर फक्त ६९ दिवसांमध्ये ९.५६ लाख कंडोम ऑर्डर करण्यात आले आहेत.

- Advertisement -

एड्स हेल्थकेअर फाऊंडेशननं हिंदूस्तान लेटेक्स लिमिटेडबरोबर स्पेशल ब्रॅण्डचे कंडोम बनवून त्याची ऑनलाईन फ्री उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला होता. या स्टोरमधून कंडोम घेण्यासाठी लोकं फोनवर किंवा ऑनलाईन बूकिंग करतात. कंडोमच्या ऑनलाईन मागणीचे आकडे थक्क करणारे आहेत, अशी प्रतिक्रिया फाऊंडेशनचे निदेशक डॉ. वी. साम प्रसाद यांनी दिली आहे. डिसेंबरपर्यंत १० लाख कंडोम पुरतील असा आमचा अंदाज होता, पण जुलैमधेच सगळा स्टॉक संपला. आता आम्ही २० लाख कंडोमची ऑर्डर दिली आहे. तसंच जानेवारी महिन्यासाठी ५० लाख कंडोमची ऑर्डरही देण्यात आल्याचं प्रसाद यांनी सांगितलंय.

फ्री कंडोम स्टोर : एड्स हेल्थ केअर फाऊंडेशन एड्सबद्दल जनजागृतीचं काम करत आहे. एड्सचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी कंडोम सगळ्यात प्रभावी माध्यम असल्याचं फाऊंडेशनचं म्हणणं आहे. म्हणूनच फाऊंडेशननं हिंदूस्तान लेटेक्स लिमिटेडबरोबर या योजनेला सुरुवात केली. HLLनं कंडोमच्या ऑनलाईन सप्लाय करण्यासाठी विशेष प्रकारचे कंडोम बनवले. या कंडोमचं नाव लव कंडोम ठेवण्यात आलं आहे. या ऑनलाईन स्टोरवर नागरिकांना कोणत्याही अटी किंवा शर्तींशिवाय कंडोम घेता येतात. जगातल्या सर्वाधिक एड्स रुग्णांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतामध्ये तब्बल २१ लाख लोक एड्सग्रस्त आहेत.

- Advertisement -