Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeदेशपंतप्रधानांना ‘ही’ भाषा शोभत नाही

पंतप्रधानांना ‘ही’ भाषा शोभत नाही

बंगळुरू: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीयांनी सकाळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर सर्जिकल स्ट्राइकवरून टीका केलेली असतानाच राहुल यांनीही त्यावर पलटवार केला आहे. ‘कर्नाटक विषयी बोलण्यासारखं मोदींकडे काहीच नाही. जेव्हा ते घाबरतात, तेव्हा ते माझ्यावर व्यक्तिगत हल्ले करतात. पण मी तसं करणार नाही. मोदीजी तुम्ही मोठे आहात. पंतप्रधान आहात. तुम्हाला ही भाषा शोभा देत नाही,’ अशी टीका राहुल यांनी केली.

औरद येथील प्रचारसभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढविला. ‘नीरव मोदींपासून भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या मुलाच्या भ्रष्टाचारापर्यंतच्या अनेक प्रश्नांवर मोदी गप्प आहेत. ते केवळ माझ्यावर व्यक्तिगत टीका करत आहेत. पण कर्नाटकबाबत चकार शब्दही काढत नाहीत. तुम्ही पंतप्रधान आहात. तुम्हाला अशी भाषा शोभत नाही. तुमच्या बोलण्यात दम आहे, असं लोकांना वाटेल असं बोला. तुम्ही नेमकं आणि सत्य बोलता असं जगालाही वाटलं पाहिजे,’ असा टोला राहुल यांनी मोदींना हाणला. भारतात कर्नाटक सरकारच सर्वात चांगलं असल्याचं स्वत: अमित शहा यांनीही म्हटलं आहे, असं सांगतानाच कर्नाटकात येऊन तुम्ही भ्रष्टाचारावर बोलता. पण तुम्ही जो मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार दिला आहे, तो सर्वात भ्रष्ट आहे, त्याचं काय? असा सवालही यांनी केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments