Placeholder canvas
Wednesday, April 17, 2024
Homeदेशआरोपींना फाशी द्या किंवा आम्हाला गोळ्या घाला, कठुआ पीडितेच्या आईची मागणी

आरोपींना फाशी द्या किंवा आम्हाला गोळ्या घाला, कठुआ पीडितेच्या आईची मागणी

जम्मू काश्मीर: जम्मू- काश्मीरमधील कठुआ येथ आठ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणानंतर संपूर्ण देशभरात यावर पडसाद उमटले आहेत. विविध ठिकाणी आंदोलने व मोर्चे काढण्यात येत आहेत. या आरोपींना फाशी द्या किंवा आम्हाला तर गोळ्या घाला अशी मागणी पीडितेच्या आईने एनडीटीव्हीशी बोलताना कली आहे. जर न्याय होऊ शकत नसेल तर आम्हा चौघांना गोळ्या घाला. ते जर सुटले तर आम्हाला मारून टाकतील.

चार गावातील लोक आमच्या जीवावर उठले आहेत. आम्ही केवळ चार लोक आहोत..सर्व काही गेले आहे. आमची मालमत्ताही गेल्याचे पीडितेच्या आईने सांगितले. पीडितेचे वडील म्हणाले की, जम्मूतील परिस्थिती पाहता तसेच वकिलांनीही कठुआत याचा विरोध केला होता. आरोपपत्राबाबतची कारवाई पुढे होऊ दिली नव्हती. त्यामुळे याची सुनावणी शांततेत होईल याबाबत आम्हाला शंका आहे. स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून आमच्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोप पीडितेच्या आईने केला आहे. राज्य पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून याचा तपास केला जावा अशी मागणीही त्यांनी केली. सीबीआय चौकशीच्या माध्यमातून आरोपींना वाचवले जाऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. पोलिसांनी आमच्या तक्रारीवर त्वरीत कारवाई केली असतील तर मुलीला वाचवता आले असते. पण त्यांनी सात दिवस वाट पाहिली, असे पीडितेच्या आईने सांगितली.

असून पीडित मुलगी माझ्या नातीच्या वयाची असल्याचे म्हटल्याचे पीडितेच्या आईला सांगण्यात आले. तेव्हा पीडितेच्या आईने यातील कोणीच निर्दोष नसल्याचे ठासून सांगितले. या प्रकरणातील आठ आरोपींनी न्यायालयात याचिका दाखल करून या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. हे प्रकरण सीबीआयकडे गेल्यास खरे आरोपी सापडतील. दरम्यान, सोमवारी या प्रकरणाची सुनावणी कठुआच्या बाहेर करण्याबाबत न्यायालय निर्णय देणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments