Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
HomeदेशCAA विरोधात 'केरळ' सरकारने दिलं सर्वोच्च न्यायालयात आव्हान

CAA विरोधात ‘केरळ’ सरकारने दिलं सर्वोच्च न्यायालयात आव्हान

Kerala, Supreme Court,Citizenship Amendment Act,CAA, Kerala Supreme Court,CAA Keralaनवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) लागू केल्यानंतर देशभरात विरोध होत आहेत. ९ राज्यांनी या कायद्याला विरोध केला आहे. आता केरळ राज्यसरकारने नागरिकत्व कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धावा घेतली आहे. नागरिकत्व कायद्याविरोधात आव्हान याचिका दाखल करणारे केरळ हे पहिलं राज्य ठरलं आहे.

केरळ सरकारकडून नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात एक जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली होती. राज्य सरकार संविधानाच्या मुल्यांचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत असून त्यासाठी पुढाकार घेत आहे. केरळ विधानसभेत सीएए विरोधात प्रस्तावही मंजूर कऱण्यात आला आहे. दरम्यान, जाहिरातीच्या माध्यमातून लोकांचा पैसा असा राजकीय मोहिमेवर खर्च करणं चुकीचं आहे असं केरळच्या राज्यपालांनी म्हटलं होतं.


हा कायदा लोकशाहीसाठी धोकादायक

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी हा कायदा लोकशाहीसाठी धोकादायक आहे, त्यामुळे असंवैधानिक असलेल्या नागरिक सुधारणा विधेयक कायदा राज्यात लागू करू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका मांडली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments