Friday, March 29, 2024
Homeदेशके. एल. सेहगल यांना गुगल डुडलद्वारे अभिवादन!

के. एल. सेहगल यांना गुगल डुडलद्वारे अभिवादन!

KL sehagal, google doodleहैदराबाद – भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार प्रसिद्ध गायक के एल सेहगल यांच्या आज ११४ व्या जयंतीनिमित्त खास डुडल बनवून गुगलने या महान गायकाला अभिवादन केले आहे. कुंदनलाल सेहगल यांच्या गायकीतून प्रेरणा घेत लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार सारख्या दिग्गजांनी यशाची शिखरे गाठली.

दशकभराच्या कारकिर्दीत त्यांनी १८५ गीते गायली. हिंदीसह अनेक भारतीय भाषांमध्ये त्यांनी गीत गात भारतीय संगीताला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.  ‘जब दिल ही टूट गया’, ‘बंगला बने न्यारा’, ‘बाबुल मोरा’, ‘हम उन्हें अपना ना बना सके’, ‘दो नैना मतवाले तिहारे’, ‘मैं क्या जानूं क्या जादू’ यासह अनेक हिट गाणी गात त्यांनी श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
गायनासोबतच सेहगल यांनी ३६ चित्रपटामध्ये काम करत आपल्या अभिनयाची छाप पाडली. ज्यामध्ये २८ हिंदी चित्रपटांचा समावेश होता. देवदास या पात्रावर आजवर अनेक चित्रपट बनले. मात्र सेहगल यांनी साकारलेला देवदास आजही सर्वश्रेष्ठ मानला जातो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments