Friday, March 29, 2024
Homeदेशचारा घोटाळ्याच्या तिसऱ्या प्रकरणातही लालू दोषी

चारा घोटाळ्याच्या तिसऱ्या प्रकरणातही लालू दोषी

रांची: राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यामागचा चारा घोटाळ्याचा ससेमिरा अजून काही सुटलेला नाही. आज चारा घोटाळ्यातील तिसऱ्या प्रकरणातही लालूंना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरविले असून त्यांना दहा लाखाच्या दंडासहित पाच वर्षाची शिक्षा सुनावली आहे. आधीच चारा घोटाळ्याच्या एका प्रकरणात साडे तीन वर्षाची शिक्षा भोगणाऱ्या लालूंना हा आणखी एक झटका बसला आहे.

चारा घोटाळ्यातील चाईबासा कोषागारातून अवैध मार्गाने रक्कम काढल्याप्रकरणी लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरविण्यात आले आहे. याच प्रकरणात बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांनाही दोषी ठरविण्यात आले आहे. या घोटाळ्यातील एकूण ५६ आरोपींपैकी ५० जणांना दोषी ठरविण्यात आले आहे. त्यामुळे या सर्वांना न्यायालय कोणती शिक्षा ठोठावतेय याकडे राजकारण्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरविल्यानंतर त्यांचे चिरंजीव आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी लालूंना या घोटाळ्यात फसविण्यात आल्याचा आरोप केला आहे. ‘भाजप आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लालूंना या घोटाळ्यात अडकविण्याचं षडयंत्र रचलं आहे. केवळ लालूंना या घोटाळ्यात अडकविणे हेच त्यांचं टार्गेट आहे. बिहारचा विकास करायचा सोडून हे लोक लालूंवर सूड उगवित आहेत. त्यामुळे लोकांमध्ये संताप आहे. मात्र तरीही न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो. आता आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत,’ असं तेजस्वी यांनी स्पष्ट केलं.

आरोप सिद्ध झाला आहे लालूवरचा त्यामुळे आता मटा ने त्याचा एकेरी उल्लेख करावा कारण आसाराम बापूंवर आरोप सिद्ध झालेले नसतानाही मटा मध्ये त्यांचा उल्लेख एकेरी असतो. मी काही आसाराम बापूंची बाजू घेऊन बोलत नाही पण सर्वाना समान नियम असावा किमान पत्रकारिता करणार्यांनी तरी हा नियम पाळावा

एकूण ९५० कोटींच्या चारा घोटाळ्यातील चार घोटाळ्यांपैकी हा एक घोटाळा आहे. चाईबासा शासकीय कोषागारातून ३५ कोटी ६२ लाख रुपये अवैध मार्गाने काढण्यात आले होते. त्यावर आज सुनावणी झाली असता लालूंना दोषी ठरविण्यात आलं आहे. यापूर्वी लालूंना देवघर कोषागार घोटाळ्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे. सध्या ते रांचीच्या बिरसा मुंडा तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments