Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeदेशलालू प्रसाद यादव तुरुंगातून बाहेर, मुलाच्या लग्नासाठी पाच दिवसांचा पेरोल

लालू प्रसाद यादव तुरुंगातून बाहेर, मुलाच्या लग्नासाठी पाच दिवसांचा पेरोल

बिहार: चारा घोटाळा प्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यादव यांना मुलाच्या लग्नाच्या पाच दिवसांचा पेरोल मंजूर करण्यात आला आहे. तेज प्रताप यादव याचा १२ मे रोजी विवाहसोहळा पार पडणार आहे. पक्षाच्या आमदार चंद्रिका राय यांची मुलगी ऐश्वर्या राय हिच्यासोबत तेज प्रताप यादव लग्नगाठ बांधणार आहे. पाटणा येथे हा विवाहसोहळा पार पडेल.

लालू प्रसाद यादव यांनी जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र गेल्या शुक्रवारी झारखंड उच्च न्यायालयात वकिलांच्या आंदोलनामुळे सुनावणी होऊ शकली नव्हती. यामुळे पेरोलसाठी अर्ज करण्यात आला. चारा घोटाळ्यातील तीन प्रकरणांमध्ये लालूंना दोषी ठरवण्यात आलं असून शिक्षा सुनावण्यात आली आहे.

लालूंना बिरसा मुंडा कारागृहात ठेवण्यात आलं होतं, मात्र तब्बेत बिघडल्यामुळे त्यांन रांचीमधील रुग्णालयात शिफ्ट करण्यात आलं. लालूंवर एम्स रुग्णालयातही उपचार करण्यात आले. नंतर तिथून पुन्हा त्यांना रांचीला पाठवण्यात आलं. मुलाच्या लग्नासाठी उपस्थित राहणारे लालू यादव यांना साखरपुड्याला हजेरी लावणं शक्य झालं नव्हतं. १८ एप्रिलला हा साखरपुडा झाला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments