Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशकर्नाटक रणसंग्राम: काँग्रेसला २५० मठांचे समर्थन, भाजपाला धडकी!

कर्नाटक रणसंग्राम: काँग्रेसला २५० मठांचे समर्थन, भाजपाला धडकी!

Siddaramaiah, congressबंगळुरू : कर्नाटक विधानसभा मतदानाची तारीख जवळ येत असल्यामुळे चांगलीच रंगत निर्माण झाली. राज्यात प्रभावशाली असलेल्या लिंगायत समाजाच्या मठाधिपतींनी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्यामागे शक्ती उभी करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे भाजप नेत्यांची धडकी भरली.

लिंगायत समाजाच्या प्रश्नांना न्याय देणाऱ्यांसोबत जाण्याचा निर्णय बंगळुरू येथे लिंगायत महासभेच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत २५० मठाधिपती सहभागी झाले होते. यामुळे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री पदाचे उमेदवार व्यकंय्यू नायडू यांना धडकी भरली.

सिध्दरामय्या यांनी भाजपला कोंडीत पकडले….
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लिंगायत धर्म मान्यतेचा मुद्दा निकाली काढून मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी भाजपला कोंडीत पकडले आहे. कर्नाटकात प्रभावी व्होट बँक म्हणून लिंगायत समाजाकडे बघितले जाते. १७ टक्के प्रमाण असलेल्या लिंगायत मतदारांचा निकालावर मोठा परिणाम अपेक्षित आहे.

असा घेतला निर्णय…
कर्नाटकात लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्यावरुन मोर्चे आणि आंदोलने केली जात आहेत. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न ऐरणीवर आला होता. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देण्यासाठी कर्नाटक सरकारने नागमोहन दास समिती स्थापन केली होती. या समितीने कायदेविषयक बाबींचा अभ्यास करून आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला. मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अहवालाला मान्यता दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments