Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशकाँग्रेसचे मंत्री दिल्लीत; राहुल गांधींनी दिले मंत्र्यांना ‘हे’ कानमंत्र

काँग्रेसचे मंत्री दिल्लीत; राहुल गांधींनी दिले मंत्र्यांना ‘हे’ कानमंत्र

Congress Meeting in Delhiमुंबई : काँग्रेसच्या नवनिर्वाचित मंत्र्यांनी आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. यावेळी नवर्निर्वाचीत मंत्र्यांना महाराष्ट्र विकास आघाडीच्या कॉमन मिनिमम कार्यक्रमांतर्गत कामे करा. राज्याच्या विकासासाठी उत्तम प्रकारे काम करा. कामाचा रिपोर्टकार्ड तयार करा. असा कानमंत्र काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी सर्व मंत्र्यांना दिला.

यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांची उपस्थिती होती. यावेळी बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, के.सी.पाडवी, अमित देशमुख, यशोमती ठाकूर, सतेज पाटील, संजय बनसोडे, अस्लम शेख, डॉ. नितीन राऊत, वर्षा गायकवाड, अशोक चव्हाण, सुनिल केदार, या मंत्र्यांची उपस्थिती होती.

सोमवारी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा विस्तार झाला. आज मंगळवारी काँग्रेसच्या मंत्र्यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना दिली. राहुल गांधी यांनी चांगल्या प्रकारे काम करा. यासाठी सर्व मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी चर्चा करण्यात आली अशीही माहिती थोरात यांनी माध्यमांना दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments