Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeदेशमहाराष्ट्र विधान परिषद, आंध्र प्रदेश पोटनिवडणुक २१ मे रोजी

महाराष्ट्र विधान परिषद, आंध्र प्रदेश पोटनिवडणुक २१ मे रोजी

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषद आणि आंध्र प्रदेशच्या पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या दोन्ही निवडणुका २१ मे रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत होणार आहेत.

महाराष्ट्र विधान परिषदेतील ६ जागा अनुक्रमे ३१ मे आणि २१ जून रोजी रिक्त होणार आहेत. भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथून अनिल दत्तात्रेय तटकरे यांचा कार्यकाळ ३१ मे रोजी संपत आहे. नाशिकच्या जयवंतराव पुंडलिकराव जाधव, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली येथील मितेश बांगडीया, परभणी-हिंगोली येथील दुरानी अब्दुल्ला खान, अमरावतीमधील प्रवीण रामचंद्रजी पोटे आणि उस्मानाबाद-लातूर-बीडचे दिलीपराव दगडोजीराव देशमुख यांचा कार्यकाळ २१ जून रोजी संपणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments