Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशमहेंद्रसिंग धोनी आला शमीच्या मदतीला!

महेंद्रसिंग धोनी आला शमीच्या मदतीला!

Mohammad Shami,MS Dhoniनवी दिल्ली : मोहम्मद शामीला पाठिंबा द्यायला आता माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुढे आला आला. त्याचबरोबर शमीचे सासरे मोहम्मद हसन यांनीही त्याची बाजू घेतली आहे. शामी पैशांसाठी पत्नी आणि देशाला धोका देऊ शकत नाही, असे वक्तव्य धोनीने केले आहे. 

भारताचा माजी कर्णधार धोनीने यावेळी शमीला पाठिंबा दशर्वला आहे. शमीबाबत धोनी म्हणाला की, ” शमी हा एक चांगला व्यक्ती आहे. तो पैशांसाठी पत्नी आणि देशाला धोकाच देऊ शकत नाही. कारण तो एक व्यक्ती आणि खेळाडू म्हणून कसा आहे, हे मी चांगलेच जाणतो. बाकी जे काही आरोप शमीच्या पत्नीने त्याच्यावर केले आहेत त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही, कारण ती त्यांची वैयक्तिक बाब आहे. त्याविषयी बोलणे उचित ठरणार नाही.

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या आडचणीत वाढ होऊ शकतो. सुत्रांच्या वृत्तानुसार, बीसीसीआयचा लाच लुचपत प्रतिबंधक विभाग लवकरच मोहम्मद शामीच्या प्रकरणाचा तपास करणार आहे. शामीची बायको पत्नी हसीन जहाँने परदेशातून पैसे आणल्याचा आरोप केला होता.

काल कोलकाता पोलिसांनी हसीनच्या तक्रारीवरून मोहम्मद शमीचा मोबाईल फोन जप्त केला असून त्याच्याकडे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील भटकंतीचा तपशील मागितला आहे. शमीवर आरोप करताना हसीन जहाँने शमीचे इतर मुलींसोबतच्या संभाषणाचे स्क्रिनशॉट आपल्या फेसबुक अकाऊंटवर टाकले होते. त्यामुळे या प्रकरणात शमीच्या मोबाईलमधील कॉल डिटेल्स आणि अन्य गोष्टींचा तपास करणे गरजेचे असल्याचे कोलकाता पोलिसांनी सांगितले आहे.

हसीनने शमीचे बऱ्याच स्त्रियांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर पाकिस्तानमध्येही त्याची एक प्रेयसी आहे. तिच्याबरोबर त्याने दुबईमध्ये काही काळ व्यतित केला आहे, असा आरोपही हसीनने केला होता. पण आता तर हसीनने शमीवर मॅच फिक्सींग आणि देशाची फसवणूक केल्याचा आरोप केला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments