होम देश विजय मल्ल्याच्या अडचणीत वाढ

विजय मल्ल्याच्या अडचणीत वाढ

26
0
शेयर

लंडन : भारतातील बँकांचे तब्बल हजार कोटी बुडवून देशाबाहेर पळालेला मद्यसम्राट विजय माल्ल्याच्या आडचणीत वाढ झाली आहे. कारण इंग्लंडमधील न्यायालयाने भारतीय बँकांचा दीड अब्ज डॉलर्सचा दावा वैध ठरवला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर  विजय मल्ल्याच्या वकिलांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया माध्यमांसमोर दिली नाही. 

भारतीय बँकानी माल्याच्या विरोधात इंग्लंडमध्ये केलेला टीड अब्ज डॉलर्सचा दावा केला होता. हा दावा इंग्लंडमधील न्यायाधिशांनी आज वैध ठरवला आहे. या निर्णयामुळे विजय मल्ल्याला दर आठवड्याला २०  हजार पाऊंड्सच बँकेतून काढता येणार आहेत. न्यायाधिश अँड्रूयू हेन्शा यांनी आपल्या निर्णयाविरोधात अपिल करण्यासही संमती दिलेली नाही. यामुळे विजय मल्ल्याच्या वकिलांना आता थेट न्यायालयात याचिकाच दाखल करावी लागण्याची शक्यता आहे.