होम देश ममता बॅनर्जींना मोदींनी रस्ता बदलून येण्याच केलं मार्गदर्शन!

ममता बॅनर्जींना मोदींनी रस्ता बदलून येण्याच केलं मार्गदर्शन!

22
0
शेयर

कोलकाता: शांती निकेतन येथील हेलिपडॅटवर पंतप्रधानांचे स्वागत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केले. यावेळी हेलिपॅडकडे येणाऱ्या मार्गात चिखल साचलेला होता, त्याकडे अंगुली निर्देश करत मोदींनी ममता बॅनर्जींना दुसऱ्या बाजूने येण्यास सांगितले. ममता बॅनर्जी धावत-पळत येत असल्याचं मोदींना दिसलं. मग मोदीही थोडे पुढे चालत गेले. तेव्हा, ममतादीदी ज्या रस्त्यानं येत होत्या, तो थोडा खराब असल्याचं त्यांना दिसलं. त्यामुळे त्यांनी लगेचच ममतांना रस्ता बदलून बाजूच्या रस्त्यानं येण्याबाबत ‘मार्गदर्शन’ केलं. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मोदी सरकार ज्या मार्गाने जातंय, त्याला कडाडून विरोध करणाऱ्या ममतांना अखेर मोदींनी मार्ग दाखवल्यानं चर्चा रंगली आहे. नुकतंच कर्नाटकमध्ये कुमारस्वामींच्या शपथविधी सोहळ्यात यूपीएच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि विरोधकांसोबत ममता बॅनर्जीही दिसल्या होत्या. विरोधकांची ही एकजूट केंद्र सरकारचं टेन्शन वाढवणारी आहे. कारण कर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने २०१९ च्या निवडणुकीची जुळवाजुळव सुरु झाल्याचं दिसत आहे.