Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशकेतकरांची इंग्रजीत, देसाईंची मराठीत, राणेंची हिंदीत शपथ!

केतकरांची इंग्रजीत, देसाईंची मराठीत, राणेंची हिंदीत शपथ!

kumar ketkar, anil desai, naryana rane
महत्वाचे…
१. संसदेत आज राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला
२. महाराष्ट्रातून जावडेकर,व्ही मुरलीधरन,चव्हाण यांचाही समावेश
३. १६ राज्यातून ५८ नवे खासदार,सहा खासदार महाराष्ट्रातून


नवी दिल्ली: संसदेत आज राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. १६ राज्यातून एकूण ५८ नवे खासदार राज्यसभेवर निवडून आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राच्या खासदारांचा समावेश आहे. या सर्वांचा शपथविधी पार पडला.

महाराष्ट्रात भाजपकडून प्रकाश जावडेकर, नारायण राणे, व्ही मुरलीधरन, काँग्रेसकडून कुमार केतकर, राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण आणि शिवसेनेकडून अनिल देसाई राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. या सर्वांचा शपथविधी आज पार पडला. राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण, शिवसेनेचे अनिल देसाई यांनी मराठीत खासदारकीची शपथ घेतली. तर प्रकाश जावडेकर, नारायण राणे यांनी हिंदीतून तर कुमार केतकर यांनी इंग्रजीमधून शपथ घेतली.
“राज्यसभेच्या खासदारकीने मी समाधानी आहे. विधीमंडळात ३० वर्षे काम केले. महाराष्ट्रातला माझा कोटा संपलेला होता, त्यामुळे दिल्लीत आलो. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचं २०१९ मध्ये काय करायचं यावर चर्चा करून निर्णय घेऊ. गडचिरोली आणि दिल्लीत फरक आहे, दिल्ली ही शिक्षेची जागा नाही”, अशी प्रतिक्रिया नारायण राणे माध्यमांशी बोलतांना दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments