Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeदेशएमआयएम कर्नाटक विधानसभा निवडणूकीत दंड थोपटणार!

एमआयएम कर्नाटक विधानसभा निवडणूकीत दंड थोपटणार!

हैदराबाद – ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्ष २०१८ च्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत भाग घेणार आहे, अशी माहिती एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी दिली आहे. एमआयएमच्या भूमिकेमुळे निवडणूकीत चांगलीच रंगत येणार आहे.

दारूसलाममधील मुख्यालयात कर्नाटक पक्षाच्या एका अंतर्गत बैठकीनंतर ओवेसी यांनी हा निर्णय जाहीर केला. ते म्हणाले, “जर आपण शांत राहिलो तर भारतीय राजकारणातील आपली ओळख पूर्णपणे पुसली जाईल.” भाजप आणि काँग्रेस हे वेगवेगळे नसून एकसारखेच असल्याची टीका यावेळी त्यांनी केली. काँग्रेस जरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलत असले तरी काँग्रेसचे सरकार असलेल्या राज्यात मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिसत नाही. त्यामुळेच मला कर्नाटकामध्ये सभा घेऊ देत नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments