Friday, March 29, 2024
Homeदेशसात महिण्याच्या चिमुकलीसोबत नराधमाचे दृष्कृत्य!

सात महिण्याच्या चिमुकलीसोबत नराधमाचे दृष्कृत्य!

अलवर : हरसाना गावातील सात महिन्याच्या चिमुकलीसोबत दुष्कृत्य केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. एका २५ वर्षाच्या तरुणाने या चिमुकलीला तिच्या ताईच्या कुशीतून उचलून नेले आणि जंगलात नेऊन तिच्यावर दुष्कृत्य केले.

संबंधित चिमुकली आपल्या दृष्टीहीन ताईच्या कुशित झोपली होती. तेवढ्यात शेजारी राहणाऱ्या २५ वर्षीय पिंटू भराडा नावाच्या तरुणाने खेळवण्याच्या बहाण्याने चिमुकलीला ताईच्या कुशीतून घेतले आणि तो गावातीलच एका तरुणाच्या गाडीवर बसून हरसाना बस स्टँडजवळ गेला. यानंतर तेथून जोहड येथे जाऊन त्याने या चिमुकलीसोबत दुष्कृत्य केले.
यावेळी मुलगी किंचाळत होती. मात्र त्याचा काहीही परिणाम या नराधमावर झाला नाही. आरोपी चिमुकलीला तेथेच ठेऊन फरार झाला. एक दुकानदार दुकान बंद करून घरी जात असताना त्याने या चिमुकलीच्या रडण्याचा आवाज ऐकला. तो त्या चिमुकलीजवळ गेला. तेव्हा ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. यानंतर त्यांने गावकऱ्यांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच मोठ्या संख्येने गावकरी घटनास्थळी दाखल झाले होते. गावकऱ्यांनी सरळ पिंटू भराडावर शंका घेतली आहे. कारण अनेकांनी त्याला मुलीला नेताना पाहिले. आरोपी पिंटू विवाहित आहे. त्याला पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. मुलीला सीएचसीच्या डॉक्टरांनी अल्वर येथे उपचारासाठी हालवले. तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments