Thursday, March 28, 2024
Homeदेशगुजरातमध्ये मॉडेल वाटणा-या श्वेता ब्रह्मभट्टचा ७५ हजार मतांनी पराभव

गुजरातमध्ये मॉडेल वाटणा-या श्वेता ब्रह्मभट्टचा ७५ हजार मतांनी पराभव

अहमदाबाद – गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना सगळयांचेच लक्ष मणिनगरच्या निकालाकडे लागले होते. मणिगनरमधून भाजपाचे सुरेश पटेल विजयी झाले असून त्यांनी काँग्रेस उमेदवार श्वेता ब्रह्मभट्टचा  ७५,१९९ मतांनी पराभव केला. मागच्यावेळी सुरेश पटेल इथून ८७ हजार मतांनी जिंकले होते. दोन कारणांमुळे मणिनगरच्या निकालाकडे सगळयांचे लक्ष लागले होते.

मणिनगर हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. २०१४ साली लोकसभेवर जाण्यापूर्वी मोदी तीनवेळा याच मतदारसंघातून निवडून विधानसभेवर गेले होते.

काँग्रेसने यावेळी मणिनगरमधून श्वेता ब्रह्मभट्टचा उमेदवारी दिल्याने हा मतदारसंघ पुन्हा चर्चेत आला होता. श्वेता ब्रह्मभट्टचा सौंदर्यामुळे माध्यमांनी तिला भरपूर प्रसिद्धी दिली. श्वेताचा फोटो किंवा तिला पाहिल्यानंतर ती मॉडेल असल्याचा अनेकांचा समज होतो. उच्चशिक्षित असलेल्या श्वेताने इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून काम केले आहे. श्वेताला मणीनगरमधून उमेदवारी जाहीर झाली. तिच्या उमेदवारीवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी श्वेताला तिकिट दिले म्हणून आंदोलनही केले होते.

श्वेताला कॉर्पोरेट क्षेत्रात काम करायचे होते. बीबीएमध्ये पदवी घेतल्यानंतर तिने लंडनच्या  विद्यापीठातून मास्टर्सची पदवी घेतली. त्यानंतर एचएसबीसी आणि डाराशॉमध्ये इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून काम केले. त्यानंतर समाजकारण आणि कॉर्पोरेट क्षेत्र असे दोन पर्याय समोर असताना तिने समाजकारणाची निवड केली. २०१२ मध्ये श्वेताला विधानसभा निवडणूक लढवायची संधी होती पण करीयर महत्वाचे असल्याने तिने ऑफर नाकारली. १९९० पासून मणिनगर भाजपाचा गड असून इथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राज्य मुख्यालय आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments