Friday, March 29, 2024
Homeदेशमोदी करतात 'मोदी की बात', राहुल गांधींचा टोला

मोदी करतात ‘मोदी की बात’, राहुल गांधींचा टोला

डाकोर – गुजरात निवडणूक अखेरच्या टप्प्यात येऊन ठेपली आहे. १४ डिसेंबरला दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचार चांगलाच भरात आहे. प्रचारादरम्यान काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी डाकोर येथील रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला.

राहुल म्हणाले, काल मी मोदींचे भाषण ऐकले. यात मोदींनी साधारणपणे ९० टक्के स्वतःवरच भाष्य केले. पुढे राहुल म्हणाले, मोदींच्या माध्यमाने भारतातील सर्व चोरांचा पैसा पांढरा झाला आहे. यावेळी त्यांनी मणिशंकर अय्यर यांनी मोदींवर केलेल्या वक्तव्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, बघा चुकीचे शब्द वापरू नका, ते पंतप्रधान आहेत. तुम्ही काँग्रेसचे आहात, प्रेमाने बोला, गोड शब्द वापरून त्यांना विरोध करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments