Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeदेशमोदी सरकारला २०१९ पर्यंत ‘यूपीए २’सारखेच भ्रष्टाचाराचे लेबल लागेल-चिदंबरम

मोदी सरकारला २०१९ पर्यंत ‘यूपीए २’सारखेच भ्रष्टाचाराचे लेबल लागेल-चिदंबरम

महत्वाचे…
१.निवडणुकीसाठीचा पैसा हीच भ्रष्टाचाराची जननी २. यूपीए-२ च्या काळात झालेल्या भ्रष्टाचारांमुळे सरकारची प्रतिमा मलीन झाली ३. दोषी ठरवले जात नाही किंवा शिक्षा होत नाही, तोपर्यंत मी त्यांना दोषी मानणार नाही


दिल्ली: मोदी सरकारला २०१९ पर्यंत यूपीए-२ प्रमाणे भ्रष्टाचाराचे ग्रहण लागेल, असे मत माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी व्यक्त केले. ते रविवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी पी. चिदंबरम यांनी म्हटले की, काँग्रेसप्रणित यूपीए-२ सरकारच्या कालावधीत अनेक घोटाळे झाले. २०१९ पर्यंत मोदी सरकारच्याबाबतीतही तेच घडेल.

यूपीए-२ सरकारने आपला नियोजित कार्यकाळ पूर्ण केला होता. मात्र, या कालावधीत सरकारची प्रतिमा मलीन झाली. त्यामुळे भविष्यात पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करणाऱ्या कोणत्याही सरकारी व्यवस्थेला भ्रष्टाचाराची कीड लागेलच. परंतु असे घडू नये, ही माझी मनापासूनची इच्छा असल्याचे चिदंबरम यांनी म्हटले. यूपीए-२ च्या काळात झालेल्या भ्रष्टाचारांमुळे सरकारची प्रतिमा मलीन झाली, हे खरे आहे. मात्र, जोपर्यंत कोणालाही दोषी ठरवले जात नाही किंवा शिक्षा होत नाही, तोपर्यंत मी त्यांना दोषी मानणार नाही, असे चिदंबरम यांनी सांगितले. सध्या ज्यांच्यावर आरोप आहेत त्या सर्वांना दोषी म्हणून गृहित धरले जात आहे. ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे. त्यामुळे देशातील कायदे पायदळी तुडवले जातात. याशिवाय, निवडणुकीसाठी पैसा उभारण्याची गरज हे भ्रष्टाचाराचे प्रमुख कारण असल्याचेही त्यांनी म्हटले. एखादी राजकीय व्यक्ती किंवा पक्षाच्याबाबतीत निवडणुकीसाठी लागणारा पैसा उभारण्याच्या नादात भ्रष्टाचार होण्याची शक्यता असते. त्यामुळे निवडणुकीसाठी पैसा उभारण्यासाठी नवे पर्याय अस्तित्त्वात येईपर्यंत या भ्रष्टाचाराची पातळी खाली येणार नाही, असे मत पी. चिदंबरम यांनी मांडले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments