Friday, March 29, 2024
Homeदेशमुंबईतील हॉटेलमध्ये आढळला खासदाराचा मृतदेह

मुंबईतील हॉटेलमध्ये आढळला खासदाराचा मृतदेह

mohan-delkar mp-suicide-update-dadra-and-nagar-haveli- mumbai-hotel
mohan-delkar mp-suicide-update-dadra-and-nagar-haveli- mumbai-hotel

मुंबई: दादरा आणि नगर-हवेलीचे खासदार मोहन डेलकर दक्षिण मुंबईमध्ये मृतावस्थेत आढळले आहेत. त्यांचा मृतदेह मरीन ड्राइव्हवरील हॉटेल सी ग्रीनमध्ये आढळला. पोलिसांना त्यांच्या रुममध्ये एक गुजराती भाषेत लिहीलेली सुसाइड नोट सापडली आहे. पोलिसांनी त्यांचा मृतदेह पोस्ट मॉर्टमसाठी पाठवला आहे.

डेलकर यांचे वय 58 वर्षे होते. ते 1989 मध्ये पहिल्यांदा खासदार झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत ते 7 वेळा लोकसभेत निवडून गेले आहेत. त्यांनी 1989 पासून 2004 पर्यंत सलग 6 वेळा लोकसभेत विजय मिळवला. डेलकर यांच्या पश्चात पत्नी कलाबेन डेलकर, दोन मुले अभिनव आणि दिविता आहेत.

भाजप, काँग्रेस आणि अपक्ष खासदार झाले

मोहन डेलकर यांनी भाजप, काँग्रेस आणि अपक्ष निवडणूक लढवल्या आहेत. त्यांनी 1991 आणि 1996 मध्ये काँग्रेसमधून निवडणूक लढवली आणि जिंकली. यानंतर 1998 च्या निवडणुकीत भाजपकडून विजय मिळवला. 1999 मध्ये त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि विजयी झाले. 2004 मध्ये त्यांनी भारत नवशक्ति पार्टी नावाने पक्ष स्थापन केला आणि परत एकदा विजयी झाले. 2019 मध्येही अपक्ष राहून विजयी झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments